डोळ्याने आहे जरी अंध,पण जगण्यात आहे धुंद!
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) औसा तालुक्यातील भादा येथील भागवत दत्तू देवरे यांचा हा दिनक्रम ठरलेला असून जरी ते डोळ्यांनी आहे अंध पण जगण्यात आहे धुंद,अशी अवस्था सध्या त्यांच्या जीवनामध्ये सुरू आहे. सध्याच्या वातावरणामध्ये मुलांची संख्या आणि मुलींची संख्या यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाल्याने सध्या अनेक तरुण चाळिशीच्या जवळ गेले असतानाही त्यांचे विवाह जोडीदार वधू अभावी दर वर्षी पोस्ट पॉन्ड केले जात आहेत होत नसल्याची खंत सध्या सर्वच समाजामध्ये व्यक्त केली जात आहे परंतु 100% डोळ्यांनी अंध असलेले भागवत दत्तू देवरे यांचा विवाह सोमवार दि 5 एप्रिल 2021 रोजी आष्टा मोड येथे 100%अंध असलेल्या मुलीशीच विवाह सोहळा मोजक्याच नातेवाईकांना घेऊन पार पडला असल्याची माहिती नूतन वर भागवत देवरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली तर या विवाहामुळे सदरील जोडपे हे दोन्हीही अंध असल्याने यांच्या संसाराचा विचार करता सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तर हा विवाह एक आगळा वेगळा सोहळा संपन्न झाला असल्याने कुतूहल व्यक्त केले जात आहे. भागवत देवरे या अंध भादेकर व्यक्तीचा दिनक्रम हा गावामध्ये कोणताही सप्ताह असो त्या ठिकाणी ते काकडा आरती पाहाटेपासून म्हणतात तर नंतर शेतामध्ये घर आहे ते गाठतात तर त्यांना निराधार योजनेचे अनुदान मिळत असल्याचे समजते अशा प्रकारे त्यांचा दैनंदिन दिनक्रम सुरू असतो.
0 Comments