Latest News

6/recent/ticker-posts

रामलिंगेश्वर देवस्थानाच्या वतीने पशुपक्ष्यांसाठी पाणवठे बनवून पिण्याच्या पाण्याची सोय

रामलिंगेश्वर देवस्थानाच्या वतीने पशुपक्ष्यांसाठी पाणवठे बनवून पिण्याच्या पाण्याची सोय


केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) रामलिंगेश्वर देवस्थान केळगाव येथे मंदिरातर्फे पशु पक्षी व जनावरांसाठी पाणवठे बनवून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. निलंगा तालुक्यातील केळगाव येथील माळरानावर असलेल्या रामलिंगेश्वर देवस्थानच्या परिसरात वनक्षेत्राचे मोठे जंगल आहे. शिवारातील काही शेतकरी आपली जनावरे माळरानावर चारण्यासाठी घेऊन जातात उन्हाळ्याचे ऊन कडक असल्यामुळे जिवाची लाही-लाही होत आहे पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची जनावरे भटकंती करत आहेत. परंतु त्या ओसाड व उंच माळरानावर जनावरांना पशु पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे. त्या जंगल परिसरातील केळगाव येथील रामलिंगेश्वर मंदिर देवस्थान च्या वतीने माळरानावर पानवठा तयार करून पशुपक्ष्यांसाठी व जनावरासाठी ते खुले करण्यात आले आहे. यामुळे अनेक पशु-पक्षी जनावरे पाणी पिऊन आपली तहान भागवत आहेत अतिशय कडक उन्हातच त्यांना पाण्याचा सहारा मिळाल्याने पशू प्रेमी तुं समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी मंदिर कमिटीच्या वतीने सिद्राम मिटकरी, बालाजी पाटील व राठोड, येथील नागरिकांच्या प्रयत्नातून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे खुले झाल्याने परिसरातील पशू प्रेमी कडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments