भादयाचे चेअरमन शेतकरी पुत्र,शेतकऱ्याच्या कल्याणाचे जमले सूत्र! शेतक-यांच्या विकासाचा खरा नायक

लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) औसा तालुक्यातील भादा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे तरुण आणि उमद्ये चेअरमन दत्तकुमार वसंतराव शिंदे हे शेतकरी पुत्र,चेअरमन असून शेतकऱ्याच्या विकासाचे जमले सूत्र! अशी प्रचिती सध्या भादा गावाला येत असल्याचे भादेकराकडून बोलले जात आहे. कोरोना महामारी मध्ये सध्या शेतकरी किंवा नागरिकांना कोणत्याही राष्ट्रीयकृत बँका एक रुपया कर्ज न देता कर्जाचे नाव काढताच जवळ थांबू देत नसताना भादा सोसायटी कडून पिक कर्ज म्हणून ऊस लागवडी करींता प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्रानुसार आणि कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर शेतक-यांना योग्य ती रक्कम विनाअट भरीव रक्कम ताबडतोड दिली जात आहे. सदरील काम करत असताना सकाळी सात ते रात्री दहापर्यंत गाव विकासासाठी झपाटलेले चेअरमन दत्तकुमार शिंदे हे मोठ्या प्रमाणात भूख तहान हरवून आगदी दहा ते बारा तास मेहनत घेत असून यांनाही कर्ज वाटपासाठी आणि स्वतःला संगणकीय ज्ञान असल्यामुळे शिपाई,सचिव,बँक इन्स्पेक्टर ते चेअरमन हि सर्व जवाबदारी सकाळी सात ते रात्री 9 ते 10 वा कार्यलयात बसून स्वतः पार पाडली जात आहे तर चेअरमन पदाला खरा न्याय देणारा लायक व्यक्ती मिळाला असल्याचीही एक अंदर की बात म्हणून चर्चिली जात आहे.यासाठी त्याच्यासोबत त्यांचे खन्दे समर्थक म्हणूंन त्याना सतत दैनंदिन कारभारात करता येईल ती मदत करणारे व्हाइस चेअरमन राजेंद्र स्वामी,संचालक अतिक बनमे,हंसराज पाटील यांची मदत मिळत आसल्याचे समजते.
0 Comments