Latest News

6/recent/ticker-posts

शिवलिंग नागापुरे शिक्षणशास्त्र विषयात पेट नंतर सेट परीक्षा ही उत्तीर्ण

शिवलिंग नागापुरे शिक्षणशास्त्र विषयात पेट नंतर सेट परीक्षा ही उत्तीर्ण 


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे)-भादा ता औसा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिवलिंग नागापुरे हे शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत अधिव्याख्याता पदासाठी आयोजित राज्यस्तरीय पात्रता (सेट)परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून त्यात जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा येथे कार्यरत शिवलिंग नागापुरे हे शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.शिवलिंग नागापुरे हे ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि शिक्षणशास्त्र या दोन विषयात पोस्ट ग्रॅज्युएट आहेत.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या दोन्ही विद्यापीठामार्फत पीएच.डी.प्रवेशासाठीची 'पेट' पात्रता परीक्षा आयोजित केली होती. शिवलिंग नागापुरे हे या दोन्ही विद्यापीठाच्या पेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.लवकरच त्यांचे पीएच.डी. चे रजिस्ट्रेशन होऊन तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी चे काम सुरू होणार आहे. शिवलिंग नागापुरे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे शाळेतील सर्व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन लटूरे व सर्व सदस्य सह भादा गावासह सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments