रमजानच्या पवित्र महिन्यात समशान भूमीत युवकांनी राबविले स्वच्छता अभियान
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) रमजान या पवित्र महिन्याचे औचित्य साधून निलंगा येथील काही तरुणांनी समशान भूमीतच स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविलेले आहे. निलंगा येथील अशोक नगर येथील समशानभूमीला अनेक जेष्ठ व सामाजिक कार्य करणाऱ्या चळवळीतील लोकं समवेत "शांतीवन" बनवून अनुभव घेतलेले हे तरुण मंडळीनी शहराच्या सर्वच समशानभूमी (कब्रस्तान) स्वच्छतेकडे व सुशोभीकरण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.सामाजिक कार्यकर्ते खुय्युम (बबलु) मासुलदार,वसीम शेख,जमीर शेख, वाजीद(लालडेकडे) शेख, सोहेल(गुड्डू)सौदागर, नसीर शेख या सहा युवकांना शहरातील हजरत दादापीर दर्गा (रह.) यांच्या पावनभूमीत परिसरात असलेली समशानभूमी (कब्रस्तान)स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आजपासून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
0 Comments