बळीराजाची आता पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरु
बी डी उबाळे
औसा: बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हणतात सध्या कोरोना विषाणू सर्वजण भयभित झाले असले तरी अन्नधान्य पिकवून साऱ्या जनतेची भूक भागवणारा शेतकरी वर्गाने प्रखर उन्हात आता पेरणीपूर्व मशागत करावयाची लगबग सुरु केली आहे. गुढी पाडव्यापर्यंत शेतकऱ्यांच्या रब्बी हंगाम संपतो परंतु यावर्षी परतीच्या पावसामुळे रब्बीची पेरणी लांबली होती त्यामुळे रब्बी ज्वारी, सूर्यफूल ,करडई,गहू, हरभरा ही पिके कापणी व मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा दिवस उशीर झाला आहे आता उद्या बळीराजाने रब्बी हंगाम संपताच खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ केला आहे,साल गड्याना वाढती मागणी असल्याने व अनेक शेतकऱ्यांकडे सालगडी व बैल बारदाना नसल्यामुळे पशुधनाचा अभाव आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाने यांत्रिक शेतीकडे आपला मोर्चा वळवला आहे मजुरीच्या दरात वाढ झाल्याने यंत्राच्या साह्याने कमी खर्चात कमी वेळात कामे आटोपून यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी,मोगडा, वखरणी,पंजी मारणे ,रोटावेटर करणे ही कामे हाती घेतली आहेत.इकडे कोरोनाविषाणूचे संकट असल्यामुळे झालेले लोकडाऊन रोज रोगांच्या भीतीने मजुरांनी शेतीच्या कामाकडे फिरवलेली पाठ यामुळे शेतकरी यांत्रिक शेती कडे झुकला आहे. त्यातच डिझेलचे दर वाढले असून नांगरणी वखरणी साठी ट्रॅक्टरला जास्त पैसे मोजावे लागतात. औसा तालुक्यात सरसकट पीक विमा मिळाला नसल्यामुळे व अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
0 Comments