Latest News

6/recent/ticker-posts

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कडक करणार- डॉ.शिवानंद बिडवे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कडक करणार- डॉ.शिवानंद बिडवे


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) तालुक्यात व शहरात कोरोनांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.शहरात तर दोनशे तीसच्या जवळपास कोरोना बांधित रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊनचा उपयोग होताना दिसत नाही.तालुक्यात ग्रामीण भागातही कोरोना वाढतच आहे.तहसिल कार्यालयामध्ये पञकारांशी संवाद साधताना डॉ.शिवानंद बिडवे म्हणाले,नागरिकांनी लॉकडाऊन बाबत सजगता घेताना दिसत नाहीत.विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत.प्रशासनाच्या नियमांचे पालन नागरिकांतुन होत नाही.कोरोना बांधित रुग्ण घरात होम आयसोलेशन असताना बिनधास्तपणे फिरत आहे.कोरोना केअर सेंटर समोर कोरोना बांधित रुग्णांचे नातेवाईक गर्दी करतात.आशा अनेक  विषयावर चर्चा केल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यांचे ते म्हणाले,शहरात विनाकारण रस्त्यावर गर्दी करणाऱ्या लोकांनवर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.पोलीस प्रशासन,महसुल विभाग,नगरपंचायत विभागातील कांही कर्मचाऱ्यांची शहरात फिरण्यासाठी पथक स्थापन करण्यात येणार आहे.हे पथक संपूर्ण शहरात फिरणार आहे.विनाकारण रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांनवर कारवाई व दंड लावणार आहे.आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांची काळजी घ्यावी असे ते म्हणाले नगरपंयाततील कर्मचाऱ्यांच्या ज्याकामासाठी नियुक्ती केली आहे.ते काम करावे.कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेले रुग्णांसाठी जेवणांचा जो डब्बा घरुन येतो.तो डब्बा तपासण्यात येणार आहे.रुग्णांनाच्या परिसरातील  स्वच्छते बाबत लक्ष देण्यात येत आहे.ग्रामीण भागात ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्यासाठी आदेश काढण्यात आले आहे.गावातील सरपंच,तलाठी,ग्रामसेवक,ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीच्या माध्यमातून काम करावे लागणार आहे.नागरिकांनी व प्रशासनाने समन्वय साधुन काम करुन कोरोनावर मात करावी लागणार आहे.ग्रामीण भागात 45 वयोगटातील व्यक्तीच्या यादया बनविण्यांचे काम युध्दपातळीवर चालु आहे.प्रत्येक गावातील ग्रामसेवक याद्दा बनवत आहेत,लसीकरणांची मोहीम गतीमान करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शासनाच्या निर्बधांचे पालन न करणाऱ्या  लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे.ग्रामीण रुग्गणालयात तीस बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तालुक्यात व शहरात पोलीस प्रशासन,महसुल प्रशासन,पंचायत समिती विभाग,आरोग्य विभाग,यांच्या माध्यमातून व नागरिकांच्रि सहकार्यतुन आपण कोरोना महामारी पासुन आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करुयात.कोविड केअर सेटर मध्ये सध्या 200 च्या वर बेड उपलब्ध आहेत.ग्रामीण भागात शाळेच्या इमारती मध्ये होम कारटंईन करण्यात येत आहे.पुढे ते म्हणाले,चाकुर तालुक्यात व शहरात सर्वाच्या समन्वयातुन नागरिकांच्या सहकार्यतुन आपण कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव थोपविण्साठी प्रयत्न करु व पञकारांनी आम्हाला योग्य त्या सुचना देऊन सहकार्य करावे असे आहवान केले.यावेळी चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ,मुख्याधिकारी अजिक्य रणदिवे,काकासाहेब जोशी,आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments