अवकाळी पावसात वीज पडून शेतकऱ्याच्या कडब्याच्या गंजीला आग
शिरोळ वांजरवाडा:{प्रतिनिधी/सलीमभाई पठाण}निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे आज सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसात वीज पडून शेतकरी वेंकट माणिक जाधव यांच्या कडब्याच्या गंजीला आग लागून कडबा जळून खाक झाला त्याचबरोबर आंब्याच्या झाडाखाली ठेवलेलं इतर साहित्य स्प्रिंकलरचा सेट आणि इतर अवजारे जळून खाक झाली आहेत. गावकऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे बाजूला असली बैलजोडी मात्र वाचली आणि जीवित हानी टळली. वीज पडल्यानंतर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. कडब्याच्या गंजीला आग लागल्यानंतर संबंधित स्थानिक तांत्रिक बाबी ने तो सुरळीत होऊ शकला नाही कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना नेहमी शेतकरी सामोरे जावे लागत आहे. वर्षभरासाठी जमून ठेवलेला शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता शेतकऱ्याला भेडसावणार आहे. संबंधित घटनेचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे. वर्षभराचा शेतकऱ्याच्या जनावरांचा चारा आसमानी संकटात जळून गेला आहे तरी प्रशासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रसाद जाधव, ईश्वर जाधव, नवाज तांबोळी, दीपक पुंडे, सलीम पठाण, सिद्धेश्वर कांबळे यांनी केली आहे.

0 Comments