औसा तालुक्यात ढगाळ वातावरणाचा फळांचा राजा आंब्याला फटका
बी डी उबाळे
औसा: मागील दोन महिन्यापासून महिन्यात दोन तीन वेळा वादळी वार्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला 12 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला.रविवार दिनांक 25 एप्रिल पासून पुन्हा विजांचा कडकडाट व ढगाळ वातावरणात पावसाने हजेरी लावली. उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने व गारपिटीमुळे गावरान आंब्याला फटका बसला असून गतवर्षीच्या समाधानकारक पावसाने बहुतांशी झाडांना मोहोर आला होता. गावरान आंब्याला आंबे ही लागले होते परंतु वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा गावरान आंब्याची कलम केलेल्या सुधारित आंब्याच्या झाडानाही बसल्याने यावर्षी आमरस शौकिनांना गावरान आंब्याची चव महागडी पडणार आहे, दोन दिवसापासून वादळी वारे व मेघ गर्जना सुरू असून ढगाळ वातावरणाने आंब्याची गळती सुरू झाली आहे. जुनाट आमराई आता दिवसेंदिवस कमी होत असून शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीचे कलम केलेल्या आंबा पिकाची फळबागा म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड केली असली तरी निसर्गापुढे कोणाचेही काहीही चालत नाही आंब्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असून स्थानिक आंबा कमी प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध झाल्यामुळे हापूस, पायरी ,केशर ,राजापुरी, तोतापुरी अशा कोकण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश व इतर भागातून आयात होणाऱ्या आब्याला अधिक पैसे मोजावे लागणार हे निश्चित. भादा व परिसरात मोठ्याप्रमाणात केशर आंबा आणि गावरान आंब्याची लागवड करण्यात आली आहे यामुळे अशा वादळी पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. तर ढगाळ वातावरणाचा आंब्याला फटका बसल्याने आंबा शौकिनांना आमरसाची चव आता महागात पडणार हे निश्चित आहे.
0 Comments