ब्रेक द चेन साठी पोलीसांची कडक भुमिका बंदचा चौदावा दिवस
शेख बी जी
औसा: दि.३० संपूर्ण राज्यात कोरोना रुगणांची होत असलेली वाढ लक्षात घेऊन, महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना विषाणूची चैन तोडण्यासाठी लावलेला लॉकडाऊनचा चौदावा दिवस औसा शहरात जागो जागी नेहमी प्रमाणे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाले,पोलीस प्रशासनाची टीम ने संपूर्ण शहरात जनतेने विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले,आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे माईक द्वारे आवाहन करण्यात आले,या वेळी ए,पी,आय,राहुल बहिरे सह पोलिस कर्मचारी चव्हाण.महारुद्र डिगे,संजय कांबळे,हे सर्व संपूर्ण शहरात पेट्रोलिंग करत होते,,पोलीस निरीक्षक पटवारी यांनी शहराच्या मुख्य ठिकाणी कडक बंदोबस्त लावलेला होता ,नगरपालिका ने विनाकारण फिरणाऱ्या वर दंडात्मक पावती आकारली यावेळी नगरपालिकेचे सचिन ओव्हाळ व पोलीस कर्मचारी शाहनवाज शेख हे यांच्या मततीला होते ,गेल्या चौदा दिवस अहोरात्र आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल विभाग, नगरपालिका कर्मचारी, स्वछता विभाग ,विविध क्षेत्रातील सर्व कर्मचारी या प्रत्येकांनी मिळालेली जवाबदारी पूर्ण पणे पार पाडत असल्याचे दिसून येते आहे,कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आणखी जनतेला सतर्क राहण्याची गरज आहे, घरी रहा सुरक्षित रहा.


0 Comments