अविनाश दादा रेशमे यांनी साधला कोविड रुग्णांशी सवांद
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे यांनी तहसीलदार गणेश जाधव यांच्यासोबत कोविड सेंटरला भेट दिली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंदळे व तहसीलदार गणेश जाधव यांच्यासोबत उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांमध्ये जाऊन औषध उपचार, ऑक्सिजन सिलेंडर,व्हेंटिलेटर,बेड इत्यादी विषयी चर्चा केली व रुग्णालयाला लागणारे जे काही आर्थिक मदत असेल ते देण्यासाठी गणेश जाधव व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंदळे यांना शब्द दिला. निलंगा तालुक्यामध्ये कोणतेही संकट आले तरी रेशमे परिवार हे समाजासाठी सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असते हे सर्वांनाच परिचित आहे. शिवसेना तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे हे स्वतः कोरोनावर वर मात करून कोविड सेंटर मधील रुग्णांशी संवाद साधला व त्याना मानसिक आधार दिला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंदळे प्रा.आण्णासाहेब मिरगाळे उपजिल्हाप्रमुख युवासेना लातूर, प्रशांत वांजरवाडे युवासेना तालुकाप्रमुख निलंगा, सुनील नाईकवाडे, श्रीनिवास भोसले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

0 Comments