भादा येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 17 नागरिकावर पोलिसात गुन्हा दाखल
बी डी उबाळे
औसा: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.परंतु अद्याप कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही.असे असताना वेळोवेळी प्रशासनाने विनाकारण घराबाहेर फिरू नये अशा जाहीर सूचना करूनही बेजवाबदार भादा येथील नागरिक बिनधास्त रस्त्यावर व इतरत्र फिरत असल्याचे निदर्शनास येताच भादा पोलिसांनी शनिवार दिनांक 1 मे 2021 रोजी दुपारी 17 नागरिकांना पकडून पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्यांच्यावर गुन्हा र नं 53/202/क 188,269,270 भादवी सह कलम 2,3,4 साथिचा रोग प्रतिबंध अधिनियम 1857 नुसार गुन्हा दाखल करण्याची धडक कार्यवाही केली आहे. पोलिसांनी पोलीस गाडीतून स्पिकरद्वारे नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका आपले जीवन सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी घरीच रहावे असे आवाहन करूनही नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना आढळून येत होते. सर्वत्र कोरोणाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही.आता तिसऱ्या टप्प्याचा वाटेवर महाराष्ट्र असताना प्रशासनाने जीवनावश्यक सेवा देण्यासाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत वेळ निश्चित केली आहे. तरीही भादा परीसरातील 45 गावातील नागरिकांचा वावर दिसत आहे.जनता कोरोना विषाणूच्या संसर्गाला गांभीर्याने घेत नसल्याने अखेर भादा पोलिस प्रशासनाला नाविलाजाने विनाकारण फिरणा-यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करावे लागले. भादा पोलिस आणि प्रत्येक गावातील ग्रामपंचायत व कर्मचारी जनतेला संकटकाळात घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन स्पीकर वरून करीत आहेत. परंतु गावामध्ये निष्काळजीपणा करीत राजरोसपणे फिरणारयांची पोलिसांनी धरपकड करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून समज दिली आहे. याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना लिंगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी नागरिकांवर कारवाई केल्याने जनतेत घबराट पसरले आहे.
भादा व परिसरातील 45 गावातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये तसेच काही खास काम असेल तर मस्त आणि सुरक्षित अंतर ठेवून स्वतःची घराची कुटुंबाची आणि गावाची काळजी घ्यावी आणि पुढे लॉकडाऊन नको असेल तर दि 15 मे 2021 पर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सर्व नागरिकांनी पाळून सहकार्य करावे जेणे पुन्हा लॉकडाऊन वाढणार नाही याची काळजी घ्यावी असे भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना लिंगे यांनी जनतेला जाहीर आवाहन केले आहे.

0 Comments