Latest News

6/recent/ticker-posts

डॉ.पाटील प्रकरणाशी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा - लिंबन महाराज रेशमे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

डॉ.पाटील प्रकरणाशी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा- लिंबन महाराज रेशमे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे कार्यरत असणारे डॉ. दिनकर पाटील यांना तहसीलदारांच्या अहवालानुसार मा. जिल्हाधिकारी यांनी तडकाफडकी निलंबित केले. डॉ.दिनकर पाटील हे अविरतपणे मागील एक वर्षापासून कोरोना रुग्णाची काळजीपूर्वक सेवा करत आहेत हे सर्वांनाच परिचित आहे. मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा डॉक्टर दिनकर पाटील यांच्याकामाची दखल घेऊन फोनद्वारे प्रशंसा केली आहे. अशा कामाप्रती एकनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी  निलंबन करणे कितपत योग्य आहे असा सवाल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व डॉ. दिनकर पाटील यांचे निलंबन रद्द करावे व पुन्हा सेवेत सामावून घ्यावे ही आग्रहाची विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments