मनसेच्या रेट्याने गटविकास अधिकाऱ्यांची ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती
मनसे टाळे घेऊन पंचायत समितीत जाताच काढला आदेश
चाकुर:(तालुका प्रतिनिधी सलीमभाई तांबोळी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या आठवड्यात लातूर जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चाकूर तालुक्यातील ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे महामारी वाढत असून त्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करा अन्यथा चाकूर पंचायत समितीला महाराष्ट्र दिनानंतर ताळे ठोकू असे निवेदन दिले होते. परंतु यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे कार्यकर्त्यांसह आज पंचायत समितीला ताळे ठोकण्यासाठी पोहचले तेव्हा प्रशासनाला याची कुणकुण लागल्यामुळे व लॉकडाऊन असल्यामुळे नायब तहसीलदार प्रकाश धुमाळ,पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट अगोदरच तिथे पोहचले व त्यांनी गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांना बोलून मार्ग काढू असे डॉ. भिकाणे यांना सांगितले. त्यावर महामारी मध्येही घरभाडे उचलून ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत ही शासनाची फसवणूक आहे त्यांच्यावर कार्यवाही करा व मुख्यालयी राहण्याची सक्ती करा अशी कडक भूमिका मनसेने घेतली तरच आंदोलन मागे घेऊ असे सुनावले. यावेळी वातावरण चांगलेच तापले परंतु तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी फोनवर गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांना तात्काळ लेखी आदेश काढण्यास सांगितले व परिस्थिती नियंत्रणात आणली. या आदेशानुसार ग्रामसेवक मुखयालयी राहतील व तेथून रोज सेल्फी सार्वजनिक करतील अशी लेखी हमी मनसेला देण्यात आली व त्यानंतर मनसेने आंदोलन थांबवले. यावेळी तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी, कृषितालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तुलसीदास माने, गणेश पस्तापुरे उपस्थित होते.
आदेशाचे पालन नाही झाले तर स्पॉट पंचनामा करणार- डॉ. भिकाणे
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे पालन नाही झाले तर तक्रार आलेल्या गावी याच प्रशासनाला घेऊन स्पॉट पंचनामा करणार व दोषी ग्रामसेवकाला निलंबित करणार असे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे म्हणाले.
0 Comments