मुस्लिम बांधवासाठी रमजान महिन्यात रोजेदारला,इफ्तारचे साहित्य वाटप
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोनाच्या महामारीमुळे सर्व मानव जात हैराण आहे. मे महिन्यात मुस्लिम बांधव रमजानचा उपवास धरतात. जवळपास १५ तास अन्ना,पाणी विना दिवसभर उपाश करतात. अशा लोकांची कांही तरी सेवा करावी म्हणून चाकुर शहरातील युवा नेते पपन कांबळे यांच्या पुढाकाराने शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये घरोघरी जाऊन मुस्लीम बांधवाना रोजा इफ्तारचे साहित्य वाटप करण्यात आले. खजुर,टरबुज,खरबुज,केळी,अश्या फळांचा किट तयार करुन रोजेदांच्या घरी जाऊन वाटप करण्यात आली.अनोखा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चाकुर यांच्यावतीने पार्टी निमित्त वार्ड क्रमांक 6 यामध्ये फळे वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष पपन कांबळे ,चंद्रकांत कसबे, मनोज महालिंगे, वर्धमान कांबळे, बबलू पठाण, गोपीनाथ कांबळे, अक्षय कांबळे, नितीन डांगे, असर कोतवाल, व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments