तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत रक्तत्यांनी केले रक्दान
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिरांची सुरुवात, १२० रक्तदात्यांनी केले रक्तदान
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा पडु नये म्हणून महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्यांचे आव्हान केले होते.चाकुर तालुक्याचे तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी १में महाराष्ट्र दिना निमित्त चाकुर येथे महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. १२० रक्तदांत्यांनी रक्तदान केले. या शिबिरांचे उदघाटन अहमदपुर-चाकुर विधानसभा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. चाकुर तहसील मध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये रक्तदांत्यांचे अभिनंदन केले. चाकुर तालुक्यातील नागरिकांनी जास्तीतजास्त रक्तदान करण्यांचे आव्हान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. यावेळी उपविभागीय आधिकारी कुदळे,डॉ.शिवानंद बिडवे,तहसीलदार,मुख्याधिकारी अजिक्य रणदिवे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पंडगे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक लांडे,नायब तहसीलदार बालाजी चितळे, महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शिबिरात चाकुर तालुक्यातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिबिरात सर्व प्रथम रक्तदान आदर्श गाव अलगरवाडी गावचे ग्रामसेवक प्रशांत राजे यांनी केले. चाकुर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनांचा प्रादुर्भाव वाढतच आहे.महाराष्ट्र दिना निमित्त १८ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात होत आहे. तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून रात्रंन-दिवस ते काम करीत आहेत. लिंबाळवाडीत कोरोनाचा उद्रेक झाला होता.येथे सर्व विभागातील यंञणाला व्यवस्थित कामाला लाऊन कोरोनाला आळा घातला.गेल्यावर्षीही कोरोना काळात त्यांनी अनेक उपाययोजना करुन तालुक्यात कोरोनांचा अटकाव केला होता.
0 Comments