औसा तालुक्यातील नागरिकांसाठी लसीकरण बाबत आवाहन
दररोज 200 लसीकरण होणार,गर्दी टाळा
बी डी उबाळे
औसा: दि 1 मे 2021 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 18 ते 44 या वयोगटातील सर्वांचे कोव्हिड-19 लसीकरण सुरु झाले आहे. लातूर जिल्ह्यात लसीकरण सुरु होत आहे, त्यातील ग्रामीण रुग्णालय औसा येथे लसीकरण केन्द्र आहे. त्यासाठी फक्त ऑनलाइन रजिस्ट्रेशन करूनच यावे लागेल, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन असणार नाही. फक्त आलेला मेसेज व आधार कार्ड दाखवून लस मिळणार आहे. येथे पुरवठा होणारी लस फक्त 18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांना दिली जाणार आहे, त्यामुळे इतरांनी गर्दी करू नये. दररोज फक्त 200 जनांनाच लस दिली जाणार आहे .कृपया याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. काही शंका असल्यास खाली दिलेल्या नंबर वर फोन करून शंका निरसन करावे. 7588611304
0 Comments