Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव येथील शेतकर्‍यांनी दिले सापाला जीवनदान;सापाला न मारता बोलावले सर्पमित्राला

केळगाव येथील शेतकर्‍यांनी दिले सापाला जीवनदान;सापाला न मारता बोलावले सर्पमित्राला


केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील शेतकरी एकनाथ वीरप्पा काळे यांच्या शेतामध्ये इंडियन कोब्रा जातीचा साप निघाला होता परंतु शेतकऱ्यांनी सापाला न मारता शेजारील राठोडा गावचे सर्पमित्र व प्राणीमित्र प्रमोद पुरी यांना बोलावून त्या सापाला जीवनदान देण्याविषयी सांगितले. प्रमोद पुरी यांना संपर्क करताच प्रमोद पुरी हे तात्काळ त्या ठिकाणी येऊन त्या सापाला पकडून स्थानिक शेतकऱ्यांना सांगितले की तो अतिशय विषारी हा इंडियन कोब्रा जातीचा साप आहे सापाला मारू नका सापाला जीवन द्या असे प्रमोद पुरी यांनी स्थानिकांना सांगितले त्यानंतर त्या सापाला बंद बरणीमध्ये घेऊन केळगाव येथील वनविभागाच्या जंगलामध्ये सोडले. नेहमी शेतकरी हे साप दिसला कि मारा मारा म्हणून सापाला मारतात परंतु दिवसेंदिवस शेतकर्‍यांमध्ये सापाविषयी आस्था वाढले असून त्यांना जीवनदान देण्यासाठी सर्पमित्रांना बोलावून त्यांना जीवनदान देत आहे.

Post a Comment

0 Comments