Latest News

6/recent/ticker-posts

बसय्या स्वामी यांचा सेवानिवृत्ती बद्दल माजी विध्यार्थी रमेश पाटील यांनी केला सत्कार

बसय्या स्वामी यांचा सेवानिवृत्ती बद्दल माजी विध्यार्थी रमेश पाटील यांनी केला सत्कार


चापोली: चाकूर तालुक्यातील चापोली येथील संजीवनी विद्यालयातील इंग्रजी विषयांचे शिक्षक बसय्या स्वामी हे ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.३०जून रोजी सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचे माझी विध्यार्थी येथील रमेश पाटील यांनी त्यांच्या सेवासमाप्ती अनुषंगाने सत्कार केला. यावेळी माझी विध्यार्थी विक्रम चाटे, गोवर्धन मद्रेवार, स्वप्नील स्वामी, गजाजन होनराव,रमाकांत स्वामी, सिद्धेश्वर होनराव,सचिन भालेराव,पवन भालेराव, रुपेश भालेराव, संदीप आबंदे,माऊली चाटे, बालाजी कांबळे,सोमेश धोंडापुरे,निखिल होनराव,निरज पाटील, यांसह आदिजन उपस्थित होते.यादरम्यान माजी विध्यार्थी रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की आजच्या या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आम्ही सर्व माझी विध्यार्थी ज्या  विविध क्षेत्रामध्ये एक यशस्वी वाटचाल करीत असताना जी स्वतःची ओळख,वलय निर्माण झाले ते सर्व स्वामी सरांच्या शिस्तप्रिय, गुणवतामक शिकवणीमूळेच, असे शिक्षक होणे खूप दुर्मिळ आहे असे म्हटले. यावेळी सत्कार मूर्ती बसय्या स्वामी यांनी सत्कारास उद्देशून मनोगत करते वेळी म्हटले की आज माझ्या ३४ वर्षाच्या शिक्षण सेवेत भरपूर सत्कार,पुरस्कार मिळाले, मात्र माझ्या सेवेदरम्यान माझ्या हातून शिकून विविध क्षेत्रामध्ये चांगल्या हुद्यावर, नोकरीवर असलेल्या माझी विध्यार्थ्यांकडून माझ्या सेवा निवृती बद्दल केलेला सत्कार हा खूप मौल्यवान व विस्मरणीय आहे असे म्हटले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पाटील तर नामदेब कांबळे सर यांनी निरोप केला.

Post a Comment

0 Comments