दिलीप गवळी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवडीबद्दल आधार प्रतिष्ठानाकडुन सत्कार
शेख बी जी
औसा: दि ३ - औसा तालुक्यातील भादा येथे ०२/०७/२०२१ रोजी आधार प्रतिष्ठान, भादा येथील कार्यालयामध्ये, भादा गावातील तरुण दिलीप रामहारी गवळी, यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांपैकी पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या 2016 मधील जाहिरातीसाठी शासनाकडून 2019 मध्ये झालेल्या मागणीनुसार तसेच माननीय न्यायालयाच्या
आदेशान्वये दि. ०१/०७/२०२१ रोजी आयोगाकडून शिफारस करण्यात आली आहे. या एकूण ५७ निवड झालेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदावर भादा गावातील दिलीप रामहारी गवळी, यांचीही निवड झाली आहे. या निमित्त आधार प्रतिष्ठान, भादा यांच्या वतीने दिलीप रामहारी गवळी, यांचा सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शनही करण्यात आले. दिलीप रामहारी गवळी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments