Latest News

6/recent/ticker-posts

विजेचा शॉक लागून मूर्त्यु पावलेल्या मुलाच्या आई वडिलांना 4 लाखांचा धनादेश सुपुत्र

विजेचा शॉक लागून मूर्त्यु पावलेल्या मुलाच्या आई वडिलांना 4 लाखांचा धनादेश सुपुत्र 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील मौजे धानोरा येथे  विशाल बिराजदार (वय 14) मामाच्या गावी आला होता. दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी विशाल व मंगेश दोघे मावस भाऊ खेळत खेळत मामाच्या शेताकडे जात असताना रामचंद्र जाधव यांच्या शेतात विद्युत तारा जमिनीपासून पासून अगदी दोन ते तीन फुट अंतरावर असल्याने विशाल बिराजदार चा हात विद्युत तारा ला लागल्याने तो जागेवरच पडला व 60% भाजल्याने तात्काळ विशाल बिराजदार ला लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान विशाल बिराजदार चा मूर्त्यु झाला होता. गावातील गोविंद जाधव व ग्रा.प. सदस्य गजानन जाधव यांनी महावितरण कार्यालयात  वेळोवेळी पाठपुरावा करून आज दि.3 रोजी स्व.विशाल बिराजदार च्या आई वडिलांना महावितरण कार्यालयात 4 लाखाचा धनादेस सुपुत्र करण्यात आले. यावेळी ढाकणे , गोविंद जाधव , महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments