शिरोळ ते निटूर(मोड़) रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था
शिरोळ:(प्रतिनिधी/सलीमभाई पठाण) निलंगा तालुक्यातील शिरोळ-वांजरवाडा ते निटूर( मोड) पर्यंतचा आठ किलोमीटर लांबीचा रस्ता मागील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे रस्त्यामध्ये मोठ मोठाले खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अचानक कोणत्याही कामासाठी व दवाखान्या साठी निघाले असता वाहनधारकांना एक तास या रस्त्यावरून जाण्याकरिता लागत आहे. आठ ते दहा किलोमीटर लांबीचे रस्त्याला साधारण एक तास लागत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था असून रस्त्यामध्ये मोठ मोठाले खड्डे पडले आहेत यामुळे दुचाकीस्वाराला व लहान चार चाकी वाहन धारकास याचा मोठा वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे तरी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी शिरोळ वांजरवाडा येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सलीम पठाण, प्रसाद जाधव, नवाज तांबोळी यांनी केली आहे.
0 Comments