Latest News

6/recent/ticker-posts

खा.शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता गणी (मामु) खडके यांचे दुःखद निधन

खा.शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता गणी (मामु) खडके यांचे दुःखद निधन




निलंगा:( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचे कट्टर समर्थक निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याचे जेष्ठ कार्यकर्ते गणि(मामू) खड़के यांचे अल्पशा आजाराने आज रविवारी दुःखद निधन झाले. इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन गणी मामु खडके गेल्या अनेक वर्षांपासून 12 डिसेंबर ला पवारसाहेबांचा वाढदिवसाला निलंगा ते काठेवाडी सायकल वरून जायचे. पवारसाहेबांनवर निस्वार्थीपणे प्रेम करनारा एक सच्चा कार्यकर्ता अशी त्यांची संपुर्ण महाराष्ट्र भर ओळख होती. त्यांचे आज दि.4 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. खा.शरद पवार यांच्या विचारांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता हरवला. गणी (मामू) यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे." मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments