राष्ट्रीय डॉक्टर्स डे चे औचित्य साधून लातूरात एबीपी माझाचा थँक यु डॉक्टर कृतज्ञता सन्मान सोहळा;डॉ. संगमेश चवंडा सन्मानित
के वाय पटवेकर
लातूर: राष्ट्रीय डॉक्टर्स डे चे औचित्य साधून एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वतीने गुरुवारी लातुरात थँक यु डॉक्टर कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात योग्य उपचार, रुग्णांना मानसिक आधार देऊन मनोबल वाढवत तब्बल चार हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनामुक्त करणाऱ्या डॉ. संगमेश चवंडा यांचा सन्मान एबीपी माझाचे वितरक मोहम्मद शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य तथा कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर, डॉ. सतीश बिराजदार, संजय जेवरीकर, सतीश तांदळे, डॉ सितम सोनवणे, निशांत भद्रेश्वर, विजय कवाळे, नागेश स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ संगमेश चवंडा यांनी कोरोनारुग्णांची अविरत सेवा करून खऱ्या अर्थाने देवदूताची भूमिका पार पाडली. रुग्णसेवेचा हा वारसा त्यांना त्यांच्या स्वर्गीय वडिलांककडूनच भेटला असल्याचे गौरवोद्गार डॉ गिरीश मैंदरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
0 Comments