Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथे राष्ट्रवादी परिसंवाद कार्यकर्ता शिबिर उत्साहात;राज्यमंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती

निलंगा येथे राष्ट्रवादी परिसंवाद कार्यकर्ता शिबिर उत्साहात;राज्यमंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती


निलंगा:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) आज निलंगा येथे राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर शहरातील स्टार फंक्शन हॉल येथे घेण्यात आला. या परिवार संवाद शिबिराला राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष सुरजचव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बूथ रचना संघटन बांधणी व पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून नेता बनून काम करण्यापेक्षा कार्यकर्ता म्हणून काम करा पक्ष आपोआप वाढेल यासाठी आज पासून कामाला लागावे व काम नाही केलं तर पक्ष दुसऱ्यांचा विचारसुद्धा करेल असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. युवक प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नेत्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा जनमाणसांत मिसळुन राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विविध योजना आणि पक्षाचे कार्य सांगून सर्वसामान्य जनता कशी राष्ट्रवादी पक्षाकडे ओढली जाईल याकडे विशेष लक्ष देऊन कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे हे सांगितले. यावेळी मंचावर पंडितराव धुमाळ, इस्माईल लदाफ, दिलीप पाटील, हसन चाऊस, पानफुलाताई पाटील हे होते. यावेळी तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धम्मानंद काळे, महेश चव्हाण, उल्हास सूर्यवंशी, सलीम पठाण, जहांगीर फकीर, फिरोज जहागीरदार, कुशाबा कांबळे आदी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments