निलंगा तालुक्यात खळबळ;एकाच शाळेतील तीन शिक्षक व दोन सेवक कोरोना बाधित
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुक्यातील धानोरा गावातील कै. राजाबाई धानोरकर विद्यालयातील तीन शिक्षक व दोन सेवकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने येथील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून बाधित शिक्षकांना त्यांच्या विनंतीवरून विलगीकरणासाठी तात्पुरत्या सेवा मुक्तीवर घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती भ्रमध्वनीद्वारे मुख्यध्यापक गणेश माने यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या होत्या त्यानिमित्त विद्यालयातील या रोगाचा संसर्ग रोखता यावा यासाठी विद्यालयातील शिक्षकांना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते यात तीन शिक्षक व दोन सेवक बाधीत निघाल्याने शिक्षण क्षेत्रात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0 Comments