फड़नवीस यांचा शहिद टीपू सुलतान संघटनेतर्फे टरबूज फोडून जाहिर निषेध
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे स्वातंत्र्य सेनानी ह. शहिद टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरुन अपमान केल्याचा जाहीर निषेध शेर-ए-हिंद शहिद टीपू सुलतान संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर टरबूज़ फोडून व निवेदन देऊन करण्यात आले. वरील विषयी सविस्तर वृत अशे की मुंबई येथील क्रीडा मैदानाला प्रथम स्वातंत्र्य सेनानी हजरत शहिद टिपु सुलतान यांचे नाव देण्यास विरोध करीत हजरत टिपु सुलतान यांच्याविषयी ते क्रूरकर्मा शासक होते त्यांनी हिंदुवर अत्याचार केले ते देशगौरव होऊ शकत नाही असा ऐकेरी वाक्यात उल्लेख करुन अपमान केल्यामुळे समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या अशा वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा संघटनेतर्फे जाहीर निषेध केला. तशा प्रमाणेच वक्तव्य अहमदपुर येथील बालाजी पांडुरंग कोटलवार या समाज कंटकानेही केला असुन त्याच्यावर काल अहमदपुर येथे गुन्हा नोंद झालेला असुन तसाच गुन्हा निलंगा येथेही दाखल करण्यात यावा व महाराष्ट्राचे वातावरण दुषित करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करुन शहीदांना न्याय व सन्मान द्यावा अश्या मागनीचे निवेदन उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, तालुका अध्यक्ष सबदर कादरी, शहर अध्यक्ष बाबा बिबराले, उमर फारुख औसेकर, हीरा कादरी, आल इंडिया पैंथर सेना जिल्हाध्यक्ष मेघराज जेवळीकर, माजीद रजा, मोहसिन शेख, मुनीर सौदागर, अरबाज शेख, मोइज क़ाज़ी, एजाज बागवान, जुबेर सय्यद, सोहेल शेख, इरफान सय्यद आदिच्या स्वक्षरया आहेत.
0 Comments