Latest News

6/recent/ticker-posts

चक्क ग्रामपंचायती समोर केला अंत्यविधी;समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांनी घेतला निर्णय

चक्क ग्रामपंचायती समोर केला अंत्यविधी;समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांनी घेतला निर्णय


निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) गेल्या २० वर्षापासून मागणी करूनही स्मशानभूमीला शासन जागा देत नाही. यामुळे वैतागलेल्या निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी येथील ग्रामस्थांनी मयत महिलेचा अंत्यविधी गावातील चौकात ग्रामपंचायत समोरच केला. हणमंतवाडी हे गाव चार हजार लोकवस्तीचे असून अध्याप गावात स्मशानभूमी नाही. गेल्या विस वर्षापासून हणमंतवाडी येथील गावकरी स्मशानभूमीसाठी जागा मागत आहेत. परंतु जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने प्रेताची अव्हेलना होत आहे. त्यामुळे गावात मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कुठे असा मोठा प्रश्न कायमच निर्माण होत असतो. गावानेच घेतला निर्णय हणमंतवाडी गावात मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कुठे असा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. हणमंतवाडी गावातील ७० वर्षीय सोजरबाई रामचंद्र निकम या वृध्द महिलेचा वृध्दपकाळाने मृत्यू झाला होता. परंतु शासन गावाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करत नसल्याने गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी गावाच्या भर चौकातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करावा लागला. संपूर्ण गावानेच निर्णय घेतला व मयत वृध्द महिलेचा अंत्यविधी गावातील चौकात ग्रामपंचायत समोर अंत्यविधी केल्यावर तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का? म्हणून अंत्यविधी केल्याचे सांगितले जात आहे.


Post a Comment

0 Comments