किनीथोट येथे गोरक्षण उभारणी; मोकाट जनावरांना मिळणार चारा पाणी आणि आसरा
विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते उद्घाटन
बी जी शेख
औसा: गावखेड्यात देवाला सोडलेले वळू आणि गायी यांना आसरा नसल्याने अन्न आणि पाण्यासाठी मोठी परवड होत असल्याने लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किनीथोट येथे तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था आणि शिवा लिंगायत युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गोरक्षण उभारण्यात येणार असल्याची माहिती शिवा लिंगायत युवक संघटनेचे अध्यक्ष दयानंद पाटील यांनी सांगितले आहे गोरक्षणाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला असून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला आहे किनीथोट येथे महादेव देवस्थान ट्रस्टची 40 एकर शेतजमीन असून या भागात अनेक भाविकांनी देवाला वळू आणि गायी सोडल्या आहेत यामुळे मुक्त संचार असलेल्या या वळू आणि गायींची चारा पाण्याची मोठी परवड होत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभं पीक रात्रीतून खाऊन संपवत असल्याने शेतकऱ्यांना पिकाचा लाभ होत नाही यामुळे लातुर येथील शिवा लिंगायत युवक संघटना आणि तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था लातुर व्दारा 40 एकरावर गोरक्षण उभारलं जात असून या मुक्या प्राण्यांच्या अन्न, पाणी आणि निवाऱ्याची सोय होणार असल्याचे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी सांगितले आहे.
0 Comments