Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ येथे आँनलाईन ग्रामसभा संपन्न

शिरोळ येथे आँनलाईन ग्रामसभा संपन्न


शिरोळ:( प्रतिनिधी सलीम पठाण ) मौजे शिरोळ वांजरवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला ग्रामसभेचे आयोजन केले होते पण ऑनलाइन ग्रामसभा असल्यामुळे आणि याची प्रथमच अंमलबजावणी होत असल्यामुळे कोरम अभावी या दिवशी ची ग्रामसभा आज दिनांक 31 जानेवारी रोजी आयोजित केली. शासनाच्या निर्देशानुसार गोविंद नियमांचे पालन करण्यासाठी ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले यामध्ये तरुण युवकांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा होऊन अंमलबजावणी करण्याचे आश्वासन ग्रामसेवक माने यांनी दिले. आजच्या ग्रामसभेत घनकचरा व्यवस्थापन, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ कनेक्शन, 15 व्या वित्त आयोगातून बाला उपक्रमात शाळेसाठी निधी आणि आयत्या वेळेचे विषय यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली गाव विकासासाठी पुरेपुर प्रयत्न करण्याचे आश्वासन ग्रामसेवक साहेबांनी दिले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी गावचे सरपंच गौतम सुरवसे हे होते तसेच ऑनलाइन ग्रामसभेत मारुती जाधव, विनोद वाघमारे, इंद्रजीत जाधव, प्रसाद जाधव, रमजान तांबोळी, नवाज तांबोळी,भीम सूर्यवंशी, ईश्वर जाधव,सलीम पठाण, गणेश शिंदे आदींनी सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments