Latest News

6/recent/ticker-posts

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते डायरीचे प्रकाशन

 पोलीस अधीक्षकांच्या हस्ते डायरीचे प्रकाशन



के वाय पटवेकर

लातूर: प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सा. क्राईम संध्या लातूर जिल्हा डायरी- 2022 चे प्रकाशन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मुक्त पत्रकार तथा माझं लातूर परिवाराचे प्रमुख सतीश तांदळे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांचा संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक डायरीत समाविष्ट आहे. या प्रकाशन सोहळ्यास क्राईम संध्याचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.शंकर सोनवणे, शहर प्रतिनिधी अमर करकरे, ज्येष्ठ समाजसेवक शेरखाने, चि. आयुष तांदळे, रत्नाकर निलंगेकर, काशिनाथ बळवंते आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक पंडित रेजितवाड, यांना क्राईम संध्याच्या लातूर विभागाकडून डायरी भेट देण्यात आली. तसेच पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन भातलवंडे यांचा यथोचित सत्कार करून त्यांना क्राईम संध्याच्या वतीने शुभेच्छा देऊन डायरी भेट देण्यात आली.

Post a Comment

0 Comments