दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते
के वाय पटवेकर
लातूर: प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लातूरच्या राधिका डेव्हलपर्स आणि ट्रॅव्हल्सच्या वतीने परिपूर्ण अशी दिनदर्शिका काढण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मुक्त पत्रकार तथा माझं लातूर परिवाराचे प्रमुख सतीश तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर शहरात बांधकाम, प्लॉट खरेदी विक्री आणि ट्रॅव्हल्स व्यवसायात अग्रगण्य असणाऱ्या राधिका डेव्हलपर्सच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून तोष्णीवाल बंधूंनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोना काळात शहरातील अनेक गरजू, मजूर, कामगारांच्या कुटूंबियांना अन्नधान्य तसेच अत्यावश्यक साहित्याचे वाटप कुठलीही प्रसिद्धी न करता केली. माझं लातूर परिवाराच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली या कार्याचे कौतुक करीत पुढील काळातही तोष्णीवाल बंधूंनी जोमात सामाजिक कार्य करावे अशी अपेक्षा पत्रकार सतीश तांदळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. पोलिस अधीक्षक कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास राधिका डेव्हलपर्स आणि ट्रॅव्हल्सचे संचालक जुगलकिशोर तोष्णीवाल, नयन ट्रॅव्हल्सचे वाजीद शेख, मुन्ना शिंदे, युवराज कांबळे, रत्नाकर निलंगेकर, व्यंकट माने, काशीनाथ बळवंते, अमर करकरे, महेश पिंपळे, प्रशांत मुसळे आदींची उपस्थिती होती.
0 Comments