आनंदमुनी विद्यालयाच्या कार्यकारणी सदस्या सुलोचना अट्टरगेकर यांचे दुःखद निधन
केळगाव: निलंगा तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कार्यकारणी सदस्य व श्रीधरराव शिवनी सार्वजनिक वाचनालय, केळगावच्य अध्यक्षा सुलोचना (गयाबाई) प्रकाश अट्टरगेकर वय 60 वर्ष यांचे आज शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी 11:00 वाजता आनंदमुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते भारतीय संस्कृती पोषक संस्था चे सचिव प्रकाश अट्टरगेकर यांच्या पत्नी होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments