मराठा सेवा संघाच्या निलंगा तालुकाध्यक्ष पदी डॉ. शेषराव शिंदे तर सचिव पदी इंजि. मोहन घोरपडे
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) मराठा सेवा संघाच्या निलंगा तालुकाध्यक्ष पदी डॉ. शेषराव शिंदे तर तालुका सचिव पदी इंजि. मोहन घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाच्या निलंगा येथील जिजाऊ सृष्टी येथील बैठकीत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. रोहन जाधव, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, जिल्हा सचिव जाधव एम एम, जिल्हा कार्याध्यक्ष ऋषिकेश कदम, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे महासचिव बालाजी जाधव, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. तसेच सोबत निलंगा शहराध्यक्ष पदी डॉ. उद्धव जाधव यांची निवड करण्यात आली, तालुका कार्याध्यक्ष पदी आर.के.नेलवाडे, तालुका उपाध्यक्ष पदी उत्तम शेळके, तालुका संघटक पदी दत्तात्रय बाबळसुरे, सह संघटक पदी किरण धुमाळ, सल्लागार पदी ऍड. तिरुपती शिंदे, तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी सुबोध गाडीवान यांची निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाच्या जिल्हा संघटक पदी विनोद सोनवणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीचे प्राचार्य डॉ.भागवत पौळ, दिलीप धुमाळ, प्रकाश सगरे,डी. बी. गुंडुरे,डॉ. सचिन बसुदे, व्यावसायिक उदय पाटील, डॉ. नितीश लंबे,संजय इंगळे,डी. बी. बरमदे,आनंद जाधव,अनिल जाधव, अजय मोरे, आर. एन. बरमदे,डी. एन. बरमदे,अरुण सोळुंके,प्रमोद कदम,सुनील टोम्पे, अमरजित पाटील, अर्जुन जाधव, माधव गाडीवान, बंटी देशमुख आदींनी स्वागत केले आहे.
0 Comments