Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथे 'संगणकशास्त्र विषयातील संधी' या विषयावरती वर्कशॉप

निलंगा येथे 'संगणकशास्त्र विषयातील संधी' या विषयावरती वर्कशॉप 


निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे संगणकशास्त्र विभागाकडून दिनांक 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी यादरम्यान 'संगणकशास्त्र या विषयातील संधी' या विषयावरती वर्कशॉप आयोजित केला आहे. या वर्कशॉपचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील मुलामुलींना IT (इम्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ) या क्षेत्रातील ओळख व संधी याबाबत माहिती व्हावी म्हणून महाविद्यालयाने न्युझीलंडस्थित TCS कंपनीचे सिनिअर मॅनेजर विष्णू पाटील यांचे आजपासून पुढील तीन दिवस विशेष शेषन (मार्गदर्शन) आयोजित केले आहे पाटील आज बोलताना IT क्षेत्रातील जॉब कसे मिळवले पाहिजेत व सद्द्या IT(इम्फॉर्मेशशन टेक्नॉलॉजी) क्षेत्रातील  इंजिनिअरला असलेली मागणी या संदर्भाने माहिती संगीतली आज किमान एक लाख IT इंजिनिअरची मागणी आहे पण प्रत्यक्षात दहा हजार IT इंजिनिअर जॉब साठी अप्लाय करताना दिसतात त्यामुळे येणाऱ्या काळात या  क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत. कोरोना महामारीनंतर या क्षेत्राला प्रचंड महत्व वाढले आहे म्हणून मुला-मुलींनी याकडे करियर म्हणून पहिले पाहिजे असे पाटील म्हणाले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एम एस कोलफुके ,उपपाचार्य डॉ. सी जी कदम,संगणक विभाग प्रमुख आर एम मदरसे ,प्राध्यापक जि एस पाटील मयूर शिंदे, कुंभार सिद्धेश्वर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments