Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश महासचिव पदी फक्रोद्दीन बुदरे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश महासचिव पदी फक्रोद्दीन बुदरे यांची निवड


देवणी(प्रतिनिधी/ विक्रम गायकवाड) देवणी येथील मुस्लिम समाजाचे उच्चशिक्षीत अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले माता नर्गीस दत्त विद्यालयाचे  प्राचार्य फक्रोदीन अमीरहुसेन बुदरे यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजीतदादा पवार व अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री,महाराष्ट्र नवाब मलिक यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश महासचिव पदी निवड करण्यात आली,हि निवड राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महमद खान पठाण यांच्या हस्ते नियुक्तीपञ देऊन करण्यात आली. या निवडीबद्दल मुस्लिम समाजात नवचैतन्य निर्माण झाले आणि फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बुदरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे भविष्यात अल्पसंख्याक समाजाचे जिल्ह्यात संघटन वाढविण्यासाठी मदत होणार आहे, तसेच प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा अनुभव पाहता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष मजबूत होणार यात तिळमाञ शंका नाही, आमच्या प्रतिनिधीने बुदरे सर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणीक प्रयत्न करेन तसेच प्रत्येक गाव तिथे शाखा काढण्याचा माझा मानस राहिल असे ते म्हणाले त्याच्या या निवडीबद्दल महाराष्ट्रचे पाणी पुरवठा राज्यमंत्री  संजय बनसोडे शिक्षक आमदार.विक्रम काळे ,प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष सुरजदादा चव्हाण, राष्ट्रवादी युवक चे प्रदेश सचिव मनोज कन्नाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते पंडितराव धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अमरदीप बोरे, काँग्रेस पार्टीचे देवणी तालुकाध्यक्ष नुतन नगरसेवक अनिल इंगोले, संगायो चे सदस्य इद्रिस भातंब्रे, कृ.उ.बा.स.संचालक अनिल कांबळे, अनिल रोट्टे,डाॕ. मल्लीकार्जुन सुरशेट्टे, अमर मुर्के, संदीप पाटील, जितेंद्र शिवगे, लक्ष्मण रणदिवे, शकिल मनियार, दत्ता चाळकापुरे, हसन मोमीन,अंकुश गायकवाड,महेश जाधव, शेख सोहेल, सचीन गवळी आदीनी अभीनंदन केले.

Post a Comment

0 Comments