राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय रद्द करावा शिवनतीताई भगवान बोराडे यांची मागणी
के वाय पटवेकर
लातूर: दारूमुळे महिला व बालकांचे हाल होत आहेत. बलात्कार, महिलांना मारझोड, पैशाची नासधूस आदी दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्रीची दिलेली परवानगी तात्काळ रुद्द करावी, अन्यथा जिजाऊ ब्रिगेड तीव्र आंदोलन करील असा इशारा जिल्हाधिकार्यक्रमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात जिजाऊ ब्रिगेडच्या लातूर जिल्हाध्यक्ष शिवमतीताई भगवान बोराडे यांनी दिला आहे. या निवेदनावर मिराताई देशमुख, वार्ड प्रमुख अनिता ताई घोडके यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीच्या मुंबई अध्यक्ष समाधानताई माने यांनी देखील निवेदनाद्वारे सरकारच्या दारू विक्रीच्या खुल्या धोरणाला विरोध केला आहे.
0 Comments