खासदार ओवेसी यांच्यावरील हल्ला प्रकरणी औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती, गृहमंत्री यांना निवेदन
बी डी उबाळे
औसा: खासदार ओवेसी हे मागील 20 वर्षांपासून भारतीय संसद मध्ये सांसद म्हणून असून त्यांना अनेक वेळा संसद रत्न पुरस्कार प्रदान झालेला आहे, वारंवार बॅरिस्टर यांच्यावर व त्यांचे निवासस्थानावर आतंकवादी हल्ले करून बॅरिस्टर यांना कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तरी सदर प्रकरणाची चौकशीसाठी एन आय ए या यंत्रणेकडून तपास करण्यात यावा व काल झालेल्या हल्ल्यातील आरोपी ची नार्को टेस्ट करण्यात यावी- व बॅरिस्टर असोदिन ओवेसी यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि संविधान रक्षण करणाऱ्या वर जाणून-बुजून हल्ले करून संप विन्याच्या या घटनेचा निषेध औसा येथे एम आय एम तर्फे करण्यात आला असून याबाबत निवेदन राष्ट्रपती गृहमंत्री यांना तहसील औसा मार्फत पाठविण्यात आले आहे. सदरील निवेदनावर सय्यद मुजफ्फर अली इनामदार, ऍड आर एम शेख, अँड हाश्मी आदींसह इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments