युक्रेन येथे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक तिथे अडकले असल्यास त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे आवाहन
लातूर:(जिमाका)दि.24 - युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भारतातून युक्रेनमध्ये कामासाठी किंवा शिक्षणासाठी गेलेल्या व सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्याच्या जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सुचना केल्या आहेत. तरी आपल्या तालुक्यातून / पोलीस स्टेशन हद्दीतून / लातूर शहर महानगरपालीका क्षेत्रातून युक्रेनला गेलेल्या व्यक्तींची माहिती पोलीस स्टेशन / पर्यटकाचे नातेवाईक / तलाठी / मंडळ अधिकारी / ग्रामसेवक यांच्याकडून संकलित करून विहित नमुन्यात या कार्यालयास यथाशीघ्र ई-मेल ddmolatur@gmail.com या ई-मेल पत्यावर पाठविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आवाहनही केले आहे.
0 Comments