आई वडील हे सर्वोच्च स्थानी असावेत- ह.भ.प.अविनाश महाराज भारती
नळेगाव: चाकुर तालुक्यातील आष्टा येथे शिव छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त ह. भ. प.अविनाश भारती यांचा शिवकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार,कर्तृत्व,नेतृत्व यावर तरुणांनी अभ्यास करून आचरणात आणण्याची गरज आहे. तसेच प्रत्येकाचे आई-वडील हे त्यांच्या मुलाबाळांच्या स्वप्नांसाठी कष्ट करत असतात झगडत असतात असे मत ह.भ.प.अविनाश महाराज भारती यांनी मांडले. आष्टा ता. चाकूर येथे शिवछत्रपती मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या किर्तनाच्या सेवेत ते बोलत होते. या कार्यक्रमास उपस्थित मा. सरपंच श्रीमंतराव शेळके, युवा नेते गणेश सूर्यवंशी, बाळासाहेब गायकवाड, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विशाल भोसले, संभाजी शेळके, ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष शेळके, ऋषीकेश यादव, गोविंद कलाडले, पांडुरंग साखरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ह.भ.प. अविनाश महाराज भारती म्हणाली की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात शहाजी महाराज व माता जिजाऊ यांचे मोलाचे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आचार-विचार हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी असे किर्तन स्वरूपी कार्यक्रम ठेवणे ही काळाची गरज आहे. या किर्तन स्वरूपी अलोट अशी गर्दी पाहण्यास मिळाली व मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, भजनी मंडळ, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, माता भगिनी, लहानथोर मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments