राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालयाची रचना हजारे सर्वद्वितीय
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाची बि.एस्सी. द्वितीय वर्गाची विद्यार्थिनी कु. रचना हजारे हीने अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राद्वारे आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेत सर्वद्वितीय क्रमांक प्राप्त केला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ही निबंध स्पर्धा अध्यासन केंद्राच्या वतीने कोरोना आणि बदलते जग या विषयावर आयोजित करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत एकूण ७० निबंध आले होते. यातुन महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील कु. रचना हजारे हीने सर्वद्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, संस्थेचे सचीव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपूके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, सांस्कृतीक विभागाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments