Latest News

6/recent/ticker-posts

नळेगावात शिवजयंतीनिमित्त 371 जणांचे रक्तदान

नळेगावात शिवजयंतीनिमित्त 371 जणांचे रक्तदान

अनिल चव्हाण यांनी केले 56 वेळा रक्तदान

नळेगाव: शिवजयंती महोत्सव समिती व अनिल चव्हाण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त गेल्या 23 वर्षापासून आयोजित करत असलेल्या रक्तदान शिबिरात 371 रक्तदात्यानी रक्तदान करून शिवजयंती साजरी केली. या शिबिराचे उद्घाटन माजी उपसरपंच सूर्यकांत चव्हाण यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग रेड्डी, सुनिल पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण, सरपंच ताजोद्दिन घोरवाडे, उपसरपंच रवी शिरूरे, उमाकांत सावंत, चांद मचकुरी, माधव गंगापुरे, अण्णाराव सोनटक्के,दिगंबर बिराजदार,शंकर पाटील,खुदबोद्दीन घोरवाडे,चंद्रकांत डोरले, मारोती भालेकर, अंगद सावंत, ज्ञानोबा येनगे,दयानंद मानखेडे, दिलीप मानखेडे, सत्यवान सावंत, डॉ.बालाजी पांचाळ, दामोदर सावंत, शिवम देवशटवार, ज्ञानेश्वर गाडेकर  आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात जोखीम विमा पॉलिसी काढण्यात आली. या साठी बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी नळेगाव, जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब, आडत व्यापारी, आडात लाईन, मार्केट कमिटी,जीप चालक मालक संघटना,संभाजी सेना यांनी सहकार्य केले.प्रत्येक रक्तदात्याची अल्पोहाराची सोय शिवभक्त ग्रुपच्या करण्यात आली तर फयाज भांडी स्टोअर्स व केकेआर फॅन्स क्लबच्या वतीने रक्तदात्याना फळ वाटप करण्यात आले. यावेळी अनिल चव्हाण यांनी 56 वे रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात 371 रक्तदात्यानी रक्तदान केले. हे शिबिर यशस्वितेसाठी शिवजयंती महोत्सव समिती आणि अनिल चव्हाण मित्र परिवारचे सत्यवान सावंत, सत्यवान जाधव, तानाजी बरचे, सत्यवान फरकांडे, बळीराम शिंदे, संतोष तेलंगे, कैलास चव्हाण, बाळासाहेब बरचे, भद्रीनाथ सोनटक्के, सुरेंद्र सावंत, बालाजी सावंत, राजू शेलार, नागनाथ बिराजदार, गजानन बिराजदार, संभाजी शेलार, मनोज धविले, अनिल धविले, पंकज गाडेकर, राहुल रेड्डी, गजानन रेड्डी, सतीश श्रंगारे, अमोल पांचाळ, दिपक जाधव, कैलास सूर्यवंशी, विजय पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन प्रमोद हुडगे व शैलेश तरी यांनी केले तर अनिल चव्हाण यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments