Latest News

6/recent/ticker-posts

बोरोळ येथे श्रीनाथ दूध संकलन केंद्राकडून पशूपालकांचा शिवजयंती चे औचित्य साधून सत्कार

बोरोळ येथे श्रीनाथ दूध संकलन केंद्राकडून पशूपालकांचा शिवजयंती चे औचित्य साधून सत्कार

   


देवणी(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तालुक्यातील बोरोळ येथील श्रीनाथ दूध संकलन केंद्रांकडून हंसराज देविदास राव बोरोळकर यांनी ३९२ व्या शिवजयंती निमित्त गावातील सर्व पशुपालकांचा व आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार आयोजित केला होता. व महाप्रसादाचे अयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचा इतर लोकांनीही आदर्श घ्यावा. आणि हे सर्व करण्याचे उद्देश म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा याचा कुठेतरी मान सन्मान सत्कार व्हावा व त्यांना चालना मिळावी व शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करावा व त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व शेतीला सेंद्रिय खताची गरज असल्याने त्या गुरा पासून सेंद्रिय खत गोमूत्र जमिनीला अत्यंत उपयुक्त घटक आहेत आणि ते काळाची गरज आहे. सर्व जमिनीमध्ये आपण रासायनिक खते औषधे कीटकनाशके तणनाशके फवारणी करून जमिनीची सुपीकता ही नाहीशी होत चाललेली आहे. म्हणून हंसराज देवणे यांचा एकच उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त होता की, शेतीला जोडव्यवसाय म्हणून गाई म्हशी मेंढ्या पाळाव्या त्यापासून आपली आर्थिक बाजू भक्कम होते. व शेतीला सेंद्रिय खत मिळते हेच उद्देश होता म्हणून गावातील पशुपालक दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांचा व पशुपालकांचा व गावातील विविध क्षेत्रातील मंडळीचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन देविदास देवणे,  राजकुमार पाटील, हंसराज देवणे, जि.प.सदस्य पृथ्वीराज शिवशिवे, राजेंद्रगिरी महाराज, संभाजी महाराज, यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस गावातील बरीच पशुपालक व प्रतिष्ठित मंडळी तरुण युवक मोठ्या संख्येने सहभागी होते सुभाष बालूरे, ज्ञानोबा बालूरे, गोपाळ बालूरे, ज्ञानेश्वर पवळे, शरद मोघे, प्रकाश बिरादार, राजकुमार थोटे, सतीश लखनगावे, माधव लखनगावे, महेश मदने, मारुती शिरसे, उद्धव देवणे, धनाजी धनाडे, कृष्णा पाटील, संजय पाटील, गोविंद सपकाळे, प्रशांत पाटील, कालिदास  देवणे, दयानंद राजोळे संजय म्हेत्रे मधुकर बालुरे  बळवंत बालूरे, नर्सिंग साबरे, दत्ता हुरूसनाळे, तानाजी बालूरे, श्रीकांत बिरादार,आदीसह संख्येने शेतकरी बांधव व पशुपालक सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप पाटील यांनी केले  तर आभार प्रा.धनाजी धनाडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments