Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ येथे शिव सप्ताह उत्साहात सुरू

शिरोळ येथे शिव सप्ताह उत्साहात सुरू


शिरोळ:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) येथे जिजाऊ प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शिवजयंती उल्हासात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून शिव सप्ताहाला सुरुवात झाली. शिरोळ येथील शिवजयंती ही दरवर्षी अभिनव उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध आहे 


सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन अनेक उपक्रम राबवत असतात या वर्षी फक्त शिवजयंती साजरी न करता शिव सप्ताह साजरा करण्याचे ठरले. शिव सप्ताहामध्ये शिव व्याख्यान, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, समाज प्रबोधनपर कार्यक्रम, कीर्तन सेवा असे विविध उपक्रम पूर्ण सप्ताहभर राबवण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांचे विचार या प्रबोधनात्मक कार्यक्रमातून सर्वसामान्य पर्यंत पोचवुन ते आचरणात आणण्यासाठी समाजघटकांना प्रवृत्त करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि शिवजयंती कशी साजरी करावी याचं अनोखा उदाहरण जनसामान्यात सादर करण्यासाठी जिजाऊ प्रतिष्ठान शिरोळ आणि शिवजयंती सार्वजनिक महोत्सव समिती चे सर्व पदाधिकारी प्रसाद जाधव, ईश्वर जाधव,किरण जाधव,मनोज जाधव, अरविंद कदम, सिद्धेश्वर कांबळे, सतीश रावजादे, बंटी जाधव आणि सर्व शिवप्रेमी यांनी कष्ट घेतले.

Post a Comment

0 Comments