Latest News

6/recent/ticker-posts

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात


के वाय पटवेकर

औरद शहजनी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युनिव्हर्सल पब्लिक स्कूल मध्ये विविध  उपक्रम राबविण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पंकज कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये विशेषतः इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने भाषणे केली. यामध्ये काही विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. रयजी ओम, शिंदे विद्या, शिंदे पूजा, शिंदे शुभांगी, लढ्ढा सोहम, बिरादार भाग्यश्री , बिरादार वेदांत, जगडाले जतिन, स्वामी  दीपाली, स्वामी बसवेश्वर अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी पाटील स्वाती यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नृत्याचे सुंदर असे सादरीकरण केले. त्यामध्ये सूर्यवंशी ज्योत्सना, पाटील किर्ती ,सोनी हर्ष, गोबाडे प्रथमेश, भंडारे श्रीहरी , पवार  मयांक, चंदनकेरे अंशुमंन, यादव  विश्वजीत, बागवान  इम्रान, हंगरगे आदित्य, भूमि हानेगावे, गड्डीमे आकाक्षा, म्हेत्रे प्रीया, बोंडगे भक्ती, पाटील  मनीकर्नीका, जोशी प्रणिता, वाघमारे प्रीती, बालवाडे प्रणिता इत्यादी विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्यामध्ये सहभाग नोंदविला तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थी आणि आठवी वर्गाचे वर्गशिक्षक सय्यद यांनी वृक्षारोपण केले, तसेच चित्रकला स्पर्धा आणि शुद्धलेखन स्पर्धाही घेण्यात आल्या. 


तसेच सर्व विद्यार्थ्यांना घोडेस्वारी ही करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी संतोष यांनी तर आभार प्रदर्शन श्रुती मॅडम यांनी मानले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments