किनगांव च्या महात्मा फुले महाविद्यालयाचा संघ सलग चौथ्यांदा विद्यापीठात अजिंक्य
किनगांव: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा गुरुवार दि २४ फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी महाविघालयाच्या क्रिडागणावर पार पडल्या या स्पर्धेत अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा संघ सलग चौथ्या वर्षी विद्यापीठात अजिंक्य ठरला आहे. सदरील स्पर्धेत मुलांचे सहा संघ सहभागी झाले होते तर मुलींच्या तीन संघानी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता मुलांच्या स्पर्धेत किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा संघ सलग चौथ्यादा अजिंक्य ठरला या संघातील विजयी खेळाडूंचा सत्कार संस्था सचिव प्रा डॉ बबनराव बोडके, प्र प्राचार्य विठ्ठल चव्हाण यांनी प्रोत्साहन देऊन या पुढील स्पर्धेत आणखी ताकतीनिशी उतरण्याचे आव्हान संस्थेचे सचिव डॉ बोडके यांनी केले या विजयी अजिक्य संघातील कर्णधार कु माधव भिसे, कु जुबेर पठाण, कु रितेश पेठकर, कु जावेद पठाण, कु कुडके कुंदन, कु पडुळे बालाजी, कु जाविद पठाण, कु सोहेल पठाण, कु अझहर सिद्दिकी यांना प्रा चेतन मुंढे,प्रा पांडुरंग कांबळे,प्रा बळीराम कासलवार,तानाजी कदम चाकुर यांचे मार्गदर्शन लाभले.विजयी खेळाडूंचा येथोचीत सत्कार संस्था आणि महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला यावेळी संस्था सचिव प्रा डॉ बबनराव बोडके, प्र प्राचार्य विठ्ल चव्हाण, प्रा पांडूरंग कांबळे , प्रा विष्णुदास पवार,प्रा बालाजी आचार्य, प्रा डॉ प्रभाकर स्वामी ,डॉ प्रा डॉ भारत भादडे ,प्रा संजय जगताप ,प्रा डॉ अनंतराव सोमुसे ,प्रा डॉ विरनाथ हुमनाबादे, प्रा सदाशीव वरवटे, प्रा डॉ अंबादास मुळे, उद्धवराव जाधव, ज्ञानेश्वर खिडसे, उमेश जाधव, इंद्रदेव पवार,शिवाजी हुंबा, किशन धरणे आदि उपस्थित होते. या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सुञ संचालन प्रा चेतन मुंढे यांनी केले तर शेवटी आभार बळीराम कासलवार यांनी मानले.
0 Comments