Latest News

6/recent/ticker-posts

प्रेमाची अनोखी केमिस्ट्री 'वन फोर थ्री' चित्रपटातून 4 मार्चला झळकणार मोठ्या पडद्यावर

प्रेमाची अनोखी केमिस्ट्री 'वन फोर थ्री' चित्रपटातून 4 मार्चला झळकणार मोठ्या पडद्यावर




के वाय पटवेकर

लातूर: रोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये वन फोर थ्री चित्रपटही पुढे सरसावत आहे, प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन  येत 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि  विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित नवा चित्रपट येत्या 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट आहे. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा प्रेमाचे विविध रंग मांडत या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिग्दर्शक, अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहाचा खलनायकी जबरा असा रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा आणि शशांक शेंडे देखील भूमिका साकारणार आहेत.


या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर लखन चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. आपल्या सर्वांची लाडकी अशी सुमधुर गायिका आर्या आंबेकर हिने भरली मना मध्ये हे चित्रपटातील गाणे सुमधूर आवाजात रेकॅार्ड केले आले. तर चित्रपटातील  'वाचू दे इष्काचा प्राण' ही कव्वाली प्रमोद त्रिपाठी यांनी गायली असून आयटम सॉंग 'पडला खटका' रेश्मा सोनावणे हिने शब्दबद्ध केले आहे. तर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी त्यांच्या दमदार आवाजात 'धिंगाणा' पार्टी सॉंग गायले आहे. नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. हे आपलं काळीज हाय या 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या टॅगलाईनने आधीच धुमाकूळ घातला असताना हा चित्रपट काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'वन फोर थ्री' चित्रपटाची कथा रिअल लाईफ स्टोरीवर आधारित असून यांत एकमेकांवर जीव जडलेल्या प्रेयसी आणि प्रियकराची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टिझरने, गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे, यांत शंकाच नाही. येत्या ४ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात दाखल होण्यास सज्ज झाला आहे.



Post a Comment

0 Comments