किल्लारी येथे 2 मार्च रोजी विशाल बौद्ध धम्म परीषदेचे आयोजन- पुज्य भन्ते डी.धम्मसार
बी डी उबाळे
औसा: लातुर जिल्ह्यातील किल्लारी येथे बुधवार दि 2 मार्च 2022 रोजी विशाल बौद्ध धम्म परीषद आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदेला जास्तीत जास्त जनतेनी उपस्थित रहावे आणि बुद्ध धम्माचे विचार ग्रहण करावेत असे आवाहन धम्म परीषदेचे संयोजक पुज्य भन्ते डी. धम्मसार किल्लारी यांनी केले आहे. विशाल अशी ही धम्म परिषद जानेवारी महिन्यात ठेवण्यात आली होती,परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ती पुढे ढकलन्यात आली होती,परंतु आता ही धम्म परिषद दि 2 मार्च रोजी घेतली जाणार आहे. श्रद्धा संप्पन्न बौद्ध उपासकांनी आणि सकल सद् मानवांनी या धम्म परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धम्मपरिषदेचे संयोजक पुज्य भन्ते डी.धम्मसार आणि किल्लारीचे उपसरपंच युवराज गायकवाड यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकराचे पणतू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब आणि पूर्णा येथील जेष्ठ भिक्खु पुज्य भदंत डाॅ.ऊपगुप्त महाथेरो यांच्या आध्यक्षतेखाली 2 मार्च रोजी होणा-या धम्म परीषेदेच्या स्वागत अध्यक्ष पदी किल्लारी ग्रामपंचायतचे सरपंच आयु. युवराज गायकवाड़ हे असनार आहेत. नांदेड, बिदर, परभणी, बिड औरंगाबाद, जालना, गुलबर्गा, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात धम्म परिषदेचा मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. या धम्म परिषदेला चैत्ययभूमी ते दीक्षाभूमी आणि राज्यभरातील प्रत्येक ठिकाणचे 15 हुन अधिक बौद्ध भिक्खु उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी बुधवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 10:00 वाजता भन्ते धम्मनाग महाथेरो हत्याळ यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण होणार आहे, दुपारी 12:00 वाजता धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे, दुपारी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे तर दुपारी 2:00 वाजता धम्म परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व बौद्ध भिक्खु यांना चिवर दान करण्यात येणार आहे. पुज्य भन्ते यांची धम्म देसना दुपारी 3:00 वाजता होणार आहे तर प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन दुपारी 3:30 वाजता होणार आहे आणि सायंकाळी 5:30 वाजता या धम्म परिषदेचा समारोप होणार आहे या धम्म परीषदेस येताना सर्वांनी शुभ्र वस्र परीधान करुन यावे व शासनाने घालून दीलेल्या कोरोना नियमांचे पालन करुण मास्क चा वापर करावा असे अवाहन पुज्य भन्ते डी. धम्मसार यांनी केले आहे.
0 Comments