औसा-भादा पुलाच्या कामाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते भूमिपूजन
शेख बी जी
औसा: दि. 25 - शहरा जवळ अनेक गावांना जोडणाऱ्या पूलाची उंची कमी असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात अनेक वाहनांना जाण्या-येण्यासाठी त्रास होत होता.या बाबीकडे लक्ष देऊन शहराचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या कामाची मंजुरी घेतली व आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. औसा शहराजवळील 'तेर-कोंड-भेटा-भादा-मुरुड औसा' मार्गावर पूल आहे. या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. या पुलावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते. परिणामी वाहतूक ठप्प होते. येथे सुमारे 1.17 कोटी रुपये खर्चून उत्तम दर्जाचा पूल बांधण्यात येईल. पुलाचे बांधकाम येत्या 3 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.या वेळी सोबत औसा भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगराध्यक्ष तथा औसा नगरपालिका निवडणूक प्रमुख किरण उटगे, ज्येष्ठ नेते तथा उद्योजक संतोष मुक्ता,कंठप्पा मुळे, गटनेते सुनील उटगे, प्रा. भीमाशंकर राचट्टे, शहराध्यक्ष लहू कांबळे, ज्येष्ठ नगरसेवक. गोपाळ धानुरे. फुटाणे काका, सौ. कल्पनाताई डांगे, सौ. सोनालीताई गुळबिले, धनराज परशने, उपअभियंता सारडा, शाखा अभियंता, बोरफळे व मुळजकर उपस्थित होते.
0 Comments