भादा ग्रामपंचायत कडून पाणी बचतीचे आवाहन
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा ग्रामपंचायत कडून केला जाणारा पाणीपुरवठा सार्वजनिक सिंचन विहिरीचे पाणी तळाला गेल्याने नागरिकांनी दैनंदिन वापराचे पाणी बचत करून वापरावे असे आवाहन ग्रामपंचायत भादा कडून करण्यात येत आहे. गतवर्षी नरेगांतर्गत सुरू करण्यात आलेली गावासाठी पाणीपुरवठा सिंचन विहीर ही गावापासून अवघ्या एक किमीच्या आत असून या विहिरीचे पाणी तळाला गेल्याने भविष्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते. याकरिता आतापासूनच पाणी बचतीचा सल्ला ग्रामपंचायत कडून ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, सरपंच मिना दरेकर, उपसरपंच बी एम शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी भादेकर नागरिकांना पाणी बचत करून वापरण्याचा अनमोल सल्ला दिला आहे.
0 Comments